ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

केडगावमध्ये मध्यरात्री बस-कंटेनरचा भिषण अपघात, ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी..

अहिल्यानगर

नगर शहरालगत असलेल्या केडगाव परिसरात ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. पुण्याच्या दिशेकडून अहिल्यानगर कडे येत असताना केडगाव अंबिका बस स्टॉपजवळ शिवाई बस कंटेनरला ओव्हरटेक करत असताना ही धडक झाली, ज्यात सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री १२ वाजता केडगाव येथील अंबिका बस स्टॉपजवळ हा अपघात झाला. शिवाईबस भरधाव वेगाने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला आहे. धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन जणांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

सर्व जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर केडगाव परिसरात रस्त्यावर मोठ्या वाहनांची गर्दी झाली. महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे