ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष..

अहिल्यानगर

देशातील राजकीय पक्षांमध्ये भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उद्यास आलाय. भाजपकडे जवळपास ६ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची बाब समोर आलीय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक तपशीलांमध्ये देशातील प्रमुख पक्षांच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक दिसून आलाय.

या तपशीलानुसार केंद्रात आणि आता दिल्लीतील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे ६,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बँक ठेवी आहेत. तर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसकडे पक्षाचे मुख्यालय आणि राज्य आणि जिल्हा युनिट्ससह फक्त ५३ कोटी रुपयांचा निधी आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की मर्यादित निवडणुका लढवूनही बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) खात्यात ५८० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की, निवडणुकीतील कामगिरी आणि पक्षाच्या आर्थिक स्थितीत काहीच थेट संबंध नसतो.

● निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाच्या (आप) केंद्रीय युनिटकडे ९.९ कोटी आहेत.

● भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवाद) (CPM) कडे ४ कोटी रुपये.

● भारतीय कम्युनिस्ट पार्टी – (CPI) कडे ४१ लाख रुपये तर

बीएसपीकडे ५८० कोटी रुपये असल्याचा तपशील निवडणूक आयोकगाकडे देण्यात आलाय. दरम्यान हे आकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर विविध पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या बँक बॅलन्स स्टेटमेंटवर आधारित आहेत.

दरम्यान २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या योगदान विवरणपत्रात काँग्रेस पक्षाला २०२४-२५ आर्थिक वर्षात ५१७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या.

या रकमेत २०,००० रुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक देणग्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याला कायद्यानं ते सार्वजनिक करणं अनिवार्य असतं. दरम्यान राजकीय पक्ष हे २०,००० रुपयांच्या देणग्याची माहिती जाहीर करत नाहीत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे