ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दामाजी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी.

सोलापूर

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी ठिक १ वाजता कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.

सदरहु सभेमध्ये सभासदांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून ती क्षमापित करणे, मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजा विषयी अहवाल स्विकारणे, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्विकारणे, त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ चा संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे,अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी देणे, पुढील वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता वैद्यानिक लेखापरिक्षक व आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे.

तसेच अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने सभासदांनी विचारलेले प्रश्न व धोरणात्मक सुचना इत्यादी विषयांवर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचार-विनीमय होणार असलेचे प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी सांगीतले.

आपल्या सभासदांच्या मालकीच्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या दि.२४/९/२०२३ रोजी संपन्न होणा-या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा.चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे