ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रांताध्यक्ष पंडित कांबळे यांचा तथागत ग्रुपचे संदिप गवई यांच्या हस्ते सत्कार

अहिल्या नगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

वाशिम – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रांताध्यक्ष पंडित कांबळे यांचा तथागत ग्रुपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार वाशिम येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वाशिमच्या पत्रकार भवनात अमरावती विभागीय संवाद बैठकीत संपन्न झाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस तसेच तथागत ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांनी पंडित कांबळे यांचा विशेष सत्कार केला. व रिसोड तालुका अध्यक्ष पदी संदिप राऊत यांची निवड करण्यात आली. वाशिम येथील पत्रकार भवन येथे सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रमेश चंदनशिव, वाशिम जिल्हा अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, सामाजिक न्याय विभाग) यांनी केले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे (वाशिम जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) उपस्थित होते. यावेळी बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती विभागीय बैठकीत उपस्थितांनी पक्षाच्या भविष्यातील कार्ययोजनांवर चर्चा केली तसेच आगामी काळात सामाजिक न्याय विभाग अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाने वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटनात्मक बळकटीकरणाला चालना मिळाल्याचे स्पष्ट झाले. कार्यप्रणाली, आगामी कार्यक्रम आणि संघटनात्मक बळकटीकरण यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

विभागातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, तालुकाध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे