पद्मशाली स्नेहिता संघम व साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यामानाने मोफत ईसीजी तपासणी व हृदयविकार शिबीर उत्साहात संपन्न.
अहिल्यानगर

पद्मशाली स्नेहिता संघम व साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यामानाने मोफत ईसीजी तपासणी व हृदयविकार शिबीरास नगरकरांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला..

रविवार 27 सप्टेंबर रोजी मोफत शिबीर घेण्यात आले होते..सकाळी 6 ते रात्री 11 अशी या शिबीराची वेळ होती..

सकाळी लवकरच 7 वाजल्या पासुन या शिबिरासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.. जवळपास 800 पर्यंत च्या नावनोंदणी आकडा दुपारी 4 वाजेपर्यंत चा होता..

अध्यक्ष डॉ रत्ना बल्लाळ, उपाध्यक्ष रेखा वड्डेपल्ली, सचिव सपना छिंदम यांनी समाजातील सर्व स्तरातील नागरिकां पर्यंत पोहोचून लोकाना ECG शिबीरासाठी प्रवृत्त केले….पद्मशाली स्नेहीता संघम च्या सर्व सभासद भगिनी यांनी या शिबिराचे चे उत्तम नियोजन केले..

डॉ दीपक , डॉ दिवाकर (लंडन ) समवेत आम्ही..


साईदीप हॉस्पिटल चे CEO डॉ मुळे, व डॉ कलेगावकर, डॉ मुनोत यांनी या कामाबद्दल आमचा सत्कार केला…






