ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी भीषण आग

मध्यप्रदेशच्या उज्जैन शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. महाकाल मंदिरात भस्म आरती सुरु असताना अचानक मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग लागली.

या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण होरपळले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथील महाकाल मंदिरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भस्म आरती सुरू होती. या आरतीला शेकडो भाविक जमले होते. आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता.

याचदरम्यान मंदिराच्या गर्भगृहाला अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच भाविक धास्तावले. त्यांनी आरडाओरड सुरू करत मंदिराच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली.

मात्र, आगीचा भडका उडाल्याने मंदिरातील पुजाऱ्यासह १३ भाविक आगीत होरपळले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे