ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरीचा येता आठवडे बाजार बुधवारी भरणार

राहुरीचा गुरुवारी भरणारा आठवडे बाजार शिव जयंती व महावीर जयंती असल्याने बुधवार दि. २७ मार्च २०२४ रोजी भरविण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असल्याने आणि याच दिवशी राहुरी शहरातील आठवडे बाजार भरत असल्याने, या कायदा व सुव्यवस्था अवाधित राखण्याच्या दृष्टीने बंद ठेवणेस अथवा आठवडे बाजार तत्पूर्वी बुधवार दिनांक २७ मार्च २०२४ रोजी भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दिनांक २८ मार्च २०२४ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मिरवणुकीचा कार्यक्रम होणार असल्याने, राहुरी शहरात भरत असलेल्या आठवडे बाजारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या दृष्टीने राहुरी शहरातील गुरुवारी भरत असलेला आठवडे बाजार बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्यामुळे गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बुधवारी भरवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी ठोंबरे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे