ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

देवेंद्र फडणवीस म्हणतात, ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जात आहे…

मराठा समाजाच्या अन् आरक्षणावर नुसंत राजकारण करणाऱ्या नेत्यांना मी समाजासाठी काय केलं? असं विचारल्यामुळे त्यांनी माझी बदनामी करण्याचं काम केलं, यांना माझी जात माहिती आहे. मी ब्राह्मण आहे. जात बदलण्याचं कारण नाही. मात्र यामुळे मला सॉफ्ट टार्गेट केलं जातं,’ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, “हे आजपर्यंत मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत. ३७ वर्षांपासून त्यांचा हा नाकर्तेपणा सुरू आहे. यामुळेच ते मला लक्ष्य करण्यासाठी एकत्रित होतात. जनता हे सारं पाहते. माझ्यासाठी माझी जात नुकसानकारक ठरते असं मी मानत नाही. मी जातीचं कार्ड कधीच खेळत नाही.

सामान्यांच्या मनात जात कधीच नसते. ते केवळ कर्तुत्त्वाकडे पाहत असतात. ते लोकांन काही काळासाठी संभ्रमात टाकू शकतात. माझ्यावर शाब्दीक हल्ले करू शकतात. पण ते हे नेहमीच करू शकत नाही,” असेही फडणवीस म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे