ब्रेकिंगमहाराष्ट्र
Ola फेस्टिव्हल ऑफर, इलेक्ट्रिक स्कूटवर 24,000 पर्यंत डिस्काऊंट

सणासुदीच्या काळात अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेत असलेल्या इलेक्ट्रिक कंपन्या डिस्काऊंट ऑफर देत आहेत.
दिग्गज इलेक्ट्रिक टू-व्हिलर बनवणारी कंपनी ओलाने फेस्टिव्हल सीजनमध्ये आपल्या इलेक्ट्रिक स्कूटवर 24,000 पर्यंत डिस्काऊंट देण्याचे ठरवले आहे.
ऑफर सोबत ओला एस1 प्रो, 2nd Gen च्या बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी आणि Ola S1 Air वर 50 रुपयांच्या सूटसह वॉरंटी एक्स्टेंशन ऑफर केली जात आहे. जुन्या पेट्रोल स्कूटरच्या बदल्यात ओला खरेदी केल्यास 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.