
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली. आजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांनी हे ट्वीट केले आहे.