मी माझ्या पगारावर समाधानी आहे’, गट विकास अधिकाऱ्याने लावलेल्या फलकाची चर्चा

सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी चक्क सामान्य माणसासाठी फलक लिहून आपल्या कार्याची चुणूक दाखवली.
ग्रामीण भागातील लोकांचा कळत नकळत सातारा पंचायत समितीशी संपर्क व संबंध येतो. अशा वेळेला घरकुला पासून ते घर , रस्ता, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती , शाळेच्या खोल्या व इतर विकास कामांबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क येतो.
गटविकास अधिकाऱ्यांना सातारा तालुक्यातील अनेक भागांमध्ये दौरे करावे लागतात. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. अशा वेळेला ते कार्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला संपर्क नंबर व आपल्या निवेदन व तक्रारी व्हाट्सअप नंबर वर पाठवून लोकांची कामे गतीने व्हावी. यासाठी फलक लावलेला आहे .
लोकांच्या मध्ये एक चांगला संदेश जावा. पारदर्शक कारभार व्हावा. याच भावनेतून त्यांनी ही अभिनव संकल्पना राबवलेली आहे. सतिश बुद्धे यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक जनतेसाठी शेअर केलेला आहे. याशिवाय त्यांनी मी माझ्या पगारात समाधानी आहे, असं म्हणत सातारा पंचायत समितीत त्यांची कारकीर्द कशी असेल याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झालेली आहे.