ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर तालुक्यात युवतीचा विनयभंग, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर मधील २३ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. मुख्य आरोपी अजय ठाणगे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना वाकोडी फाटा, सोलापूर रोड परिसरात १४ डिसेंबर रोजी घडली.

आरोपीने मोटारसायकलवरून तक्रारदार युवतीचा पाठलाग केला. रस्ता अडवून मुख्य आरोपी अजय ठाणगे याने युवतीचा उजवा हात पकडला. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यासोबतच आरोपींनी पीडित युवतीला शिवीगाळ करत ‘पाहून घेतो’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपी अजय ठाणगे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून, महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे