ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

नाशिक नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित

गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागताहार्य असून या निर्णयाने नाशिक नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्याची प्रतिक्रिया शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना घुले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी अलिकडेच पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबदची राज्य सरकारची भूमिका जाहिर केलेली आहे.

शिर्डी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातल्या पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असं सांगितले.

परभणी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. हे संकट दूर करण्यासाठी आमच्या सरकारने गत काळात वॉटरग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता; परंतु त्याला महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षित गती मिळाली नाही.

मात्र, आता त्यासाठी आवश्यक असलेल्या २० हजार कोटींसाठी निश्चितच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन यांनी दिले. तर बीड येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे.

धरणांमधील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. हाच धागा पकडून आगामी काळात पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू, यासाठी १ लाख कोटी रुपये लागले तरी चालतील, असे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे नाशिक- नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील जनतेच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे या केवळ घोषणाच न राहाता कृतित ठरवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणे अपेक्षित आहे.

समुद्रात वाहून जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे गोदावरी खोऱ्यात वळवावे, ही गेल्या २० वर्षां पासूनची आमची मागणी आहे. याकरीता राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सातत्याने पत्र व्यवहार व जलसंपदा मंत्री यांच्या गाठीभेटी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे