ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२५-२६ जाहीर.. अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ प्राथमिक शिक्षकांचा सन्मान

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (विकास शाखा-१) यांच्याकडून जिल्हा शिक्षक पुरस्कार सन २०२५-२६ साठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शिक्षकांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश जारी केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडील प्रस्तावानुसार आणि ग्राम विकास व जलसंधारण विभागाचे शासन परिपत्रक दि. १२/१२/२००० व शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि. १६ जुलै २०२५ नुसार या पुरस्कारास मान्यता देण्यात आली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक व त्यांच्या शाळा पुढीलप्रमाणे –

१. श्रीम. सुमन गणपत खतोडे – जि.प. प्राथमिक शाळा, नवलवाडी, ता. अकोले

२. श्रीम. दिपाली काशिनाथ रेपाळे – जि.प. प्राथमिक शाळा, जाखुरी, ता. संगमनेर

३. श्री. सुनिल किसन पोरे – जि.प. प्राथमिक शाळा, घोयेगाव, ता. कोपरगाव

४. श्री. संदिप जनार्दन कोरडे– जि.प. प्राथमिक शाळा, गोंडेगव्हाली, ता. राहाता

५. श्रीम. स्वाती तान्हाजी पटारे– जि.प. प्राथमिक शाळा, अशोक नगर, ता. श्रीरामपूर

६. श्रीम. सुवर्णा मोहन कचरे – जि.प. प्राथमिक शाळा, कुक्कुडवेढे, ता. राहुरी

७. श्री. राहुल अशोक आठरे – जि.प. प्राथमिक शाळा, भालगाव, ता. नेवासा

८. श्रीम. सुरेखा काशिनाथ खाडे – जि.प. प्राथमिक शाळा, रांजणी, ता. पाथर्डी

९. श्री. अमोल पंढरीनाथ पवार– जि.प. प्राथमिक शाळा, वावी, ता. जामखेड

१०. श्री. अमोल भिमराव हुमे – जि.प. प्राथमिक शाळा, अंबिकानगर, ता. कर्जत

११. श्री. शाहाजी दत्तात्रय खराडे – जि.प. प्राथमिक शाळा, भानगाव, ता. श्रीगोंदा

१२. श्री. प्रविणकुमार रमाजी झावरे – जि.प. प्राथमिक शाळा, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर

१३. श्री. मनोज महिचंद्र काशिद– जि.प. प्राथमिक शाळा, खोसपुरी, ता. नगर

१४. श्री. किशोर एकनाथ मिसाळ – जि.प. प्राथमिक शाळा, शिरेपेवस्ती, ता. शेवगाव

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे