ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून तरुणाची फसवणूक

अहिल्यानगर

क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून ते पुन्हा सुरू करण्याची अथवा कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया करण्याच्या बहाण्याने बँकेच्या कर्मचाऱ्याचे बनावट रूप धारण केलेल्या भामट्यांनी एका तरुणाची एक लाख २७ हजार ४९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत कल्याण रोड परिसरात राहणाऱ्या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर १ जून रोजी सायंकाळी तीन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन आले.

यातील एका व्यक्तीने आपण ॲक्सिस बँकेच्या सपोर्ट टीममधून बोलत असल्याचे सांगितले. त्याने व्हॉट्सॲपवर ॲक्सिस बँकेचे असल्याचे भासणारे ओळखपत्रही पाठविल्याने फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे