अहिल्यानगर पद्मशाली समाजातील पदवीधारक व पदविकाधारकांचा सन्मान सोहळा २०२६
अहिल्यानगर - गुणवंतांचा सन्मान... नव्या पिढीला प्रेरणादायी संदेश..

अहिल्यानगर मधील गुरुवर्य पोट्यन्ना बतीन शैक्षणिक सामाजिक मंडळ, अहिल्यानगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मशाली समाजातील पदवीधारक, पदविकाधारक व शिक्षकांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
https://forms.gle/Bd8cePkPywGiXeB19
लिंक मध्ये आपले नाव नोंदवावे…
सन २०२६ या शैक्षणिक वर्षात पदवी, पदविका व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पद्मशाली समाजातील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
सन्मानाचे स्वरूप – प्रमाणपत्र, बॅग, पुष्प..
विशेष आवाहन – यावर्षी २०२६ मध्ये पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवावे.
तसेच, आपल्या ओळखीतील पात्र विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश आवर्जून पोहोचवावा, जेणेकरून एकही विद्यार्थी सन्मानापासून वंचित राहणार नाही.
महत्त्वाची सूचना – कार्यक्रमाला येताना आपले गुणपत्रक किंवा प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
शनिवार – दि. १२ सप्टेंबर २०२६.
सायंकाळी – ४.३० वाजता
पत्ता – श्री.मार्कंडेय संकुल, दातरंगे मळा, अहिल्यानगर..
आपला सहभाग आणि उपस्थिती हीच या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची खरी दाद ठरेल..




