ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये फॉर्च्युनर कार खरेदीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

अहिल्यानगर मधील कार खरेदीचा व्यवहार करून उर्वरित रक्कम न देता गाडी परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी येथील कुष्ठधाम रस्ता परिसरातील रहिवासी व जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे कृष्णा दगडू शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

कर्जत येथील पाटील गल्लीत राहणारा सचिन विठ्ठलराव घुले याने ५ जुलै २०२५ रोजी प्रेमदान चौकातील एका कार्यालयासमोर कृष्णा शिंदे यांच्या टोयोटा फॉर्च्युनर कारचा (क्रमांक एमएच १६ डीएम ८५९५) सौदा ठरवला होता.

हा संपूर्ण व्यवहार ३४ लाख ५० हजार रुपयांना ठरला होता. सचिन घुले याने तीन दिवसांत सर्व पैसे देण्याचा विश्वास दाखवून शिंदे यांची गाडी ताब्यात घेतली.

त्यानंतर त्याने व्यवहारापोटी २७ लाख ९५ हजार रुपये दिले; मात्र उर्वरित ६ लाख ५५ हजार रुपये दिले नाहीत. वारंवार मागणी करूनही शिल्लक पैसे परत न देता गाडीही परत केली नाही व ती इतर कोणालातरी देऊन परस्पर विल्हेवाट लावली.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन विठ्ठलराव घुले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे