ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तब्बल १४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरू होणार..

अहमदनगर प्रतिनिधी

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरू करता येणार आहेत. दरम्यान, २०१९ ते २०२४ या गेल्या पाच वर्षांत ५९३ नवीन महाविद्यालये सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड ) बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.

या बैठकीस उपमुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरू करण्यासाठी स्थळबिंदू निश्‍चित केले जातात. या स्थळबिंदू निश्‍चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘नॅक’ मानांकन मिळाले आहेत, मात्र ‘कायम विनाअनुदानित’ महाविद्यालयांनी देखील ‘नॅक’ मानांकन मिळविण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे नोंदणीची कार्यवाही करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे