ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

एकाच दिवशी आलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक व मोहंमद पैगंबर जयंती मिरवणुकीचा पेच अखेर सुटला

अहमदनगर प्रतिनिधी

यावर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक (अनंत चतुर्दशी) व मोहंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलादुन्नबी) उत्सवाची मिरवणुक एकाच दिवशी 28 सप्टेंबर रोजी येत असल्याने हिंदू – मुस्लिम समाजाचे दोन्ही उत्सव शांततेत साजरा होण्याच्या उद्देशाने शहरातील तख्ती दरवाजा ईद मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने पैगंबर जयंतीचा उत्सवाची मिरवणुक रविवारी 1 ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे.

धार्मिक ऐक्य व जातीय सलोख्यासाठी मुस्लिम समाजाने मनाचा मोठेपणा दाखवत घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

हिंदू-मुस्लिम समाजाचे महत्त्वाचे सण एकाच दिवशी येत असल्याने व दोन्ही उत्सवाचा मिरवणुक मार्ग व वेळ एकच असल्याने पोलीस प्रशासनापुढे बंदोबस्ताचा मोठा पेच निर्माण झाला होता.

शहरात धार्मिक एकता व सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेवून मोहंमद पैगंबर जयंती उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने तख्ती दरवाजा ईद मिलादुन्नबी कमिटी,मोहरम उत्सव समिती, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व यंग पार्टीचे प्रमुख व धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये तख्ती दरवाजा मशिदीमध्ये बैठक पार पडली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे