पद्मशाली समाज पारंपरिक पद्धतीने दरवर्षी मोठ्या भव्य रथोत्सव, कांतारा नृत्य मुख्य आकर्षण.. नव्या पिढीने परंपरेचा हा वारसा जपणार – आमदार संग्राम जगताप
अहिल्यानगर

नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री मार्कडेय देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज वतीने श्री माकैडेय रथोत्सव पालखी शोभायात्रा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी केले होते..

गांधी मैदानातील श्री महर्षी मार्कडेय महामुनींच्या मंदिरात आमदार जगताप यांच्या हस्ते मार्कडेय महामुनींच्या मूर्तीचे पूजन आणि आरती करण्यास आली..

मार्कडेय महामुनींच्या जयघोषात रथोत्सव पालखी शोभायात्रेस प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम, पंच कमिटीचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, राजू म्याना, बाळकृष्ण सिद्दम व ज्ञानेश्वर मंगलारम यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन झाले.
श्री, मार्कंडेय महामुनीची पालखी ठेवण्यात आली होती.. तसेच महादेवाच्या पिंडीला कवटाळून बसलेल्या मार्कंडेय महामुनींची मोठी मूर्ती सजवलेल्या रथात ठेवण्यात आली होती.
पद्मशाली समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या कापड विणण्याचे हातमाग यंत्रही या मिरवणुकीत होते. पद्मशाली समाजाचे पारंपरिक कोलावू नृत्य पथक, महिलांचे फुगडी पथक, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या मार्कडेय विद्यालयाच्या विद्याथ्यांचे टिपरी, लेझीम पथक व लाठीकाठी आदी पथकांचे सादरीकरण पाहण्यामानी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक मल्ला खांबांच्य प्रात्यक्षिकांना नागरिकांनी दाद दिली या मिरवणुकीत तालयोगी बोल ताशा ध्वज पथक सहभागी होते रथोत्सव मिरवणुकीदरम्यान सहभाग भाविकांना ठिकठिकाणी महाप्रसाद अल्पोपहार, पाणी वाटप करण्यात येत होते.
या संपूर्ण मिरवणुकीत पोलीस प्रशासन चांगले सहकार्य केल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी ठिक ठिकाणी अल्पोपहार पाणी वाटप केले.. व वाहतूक शाखेचे कर्मचाऱी सर्वांचे देवस्थान कमिटी तर्फे सर्वांचे सत्कार करून आभार व्यक्त केले..
यावेळी मार्कडेय देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम संजय वल्लाकट्टी , श्रीपाद छिंदम, अजय म्याना ,कुमार आडेप ज्ञानेश्वर मंगलारप, राजू म्याना अशोक सब्बन, महेंद्र बिज्जा ,मान्यवर उपस्थित होते..




