सेल्फी विथ गणपती बाप्पा 2026..आमचे डेकोरेशन आमची आरास…
पाण्याचे संवर्धन कसे करावे हे देखील या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न..

नाव- सौ. प्रियांका विनायक गोडसे.
पत्ता – मुक्काम पोस्ट वडूज..
तालुका खटाव जिल्हा सातारा..
आमचा गणपती बाप्पा हा शाडू मातीचा आहे आणि तो आम्ही स्वतः घरी बनवलेला आहे. संपूर्ण देखावा हा पर्यावरण पूरक आहे.
आम्ही पाणी वाचवा जीवन वाचवा,नदी वाचवा असा सामाजिक संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.. गणपती बाप्पा हा प्रत्येक थेंब मोलाचा आहे.. पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश देत आहेत त्याचबरोबर आजची नदीची अवस्था कचऱ्याने भरलेली म्हणजे प्लास्टिक कागद कचरा निर्माल्य नदीत टाकून आपण नदी खराब करतो त्यापासून रोगराई पसरते आणि आपली जबाबदारी म्हणजे नदी स्वच्छ ठेवणे त्याचा संरक्षण करणे व उज्वल भविष्य निसर्गरम्य वातावरण स्वच्छ परिसर फुले पक्षी फुलपाखरे असा आनंदी वातावरण असा आम्ही देखावा सादर केला आहे.
त्याचबरोबर रोजच्या राहणीमानीमध्ये *पाण्याचा अतिवापर कसा होतो..आणि पाण्याचे संवर्धन कसे करावे हे देखील या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे..





