गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र
सेल्फी विथ गणपती बाप्पा 2026..आमचे डेकोरेशन आमची आरास…
परंपरा जपत, टाकाऊ वस्तूंपासून नवी निर्मिती करत, समुद्राचे संरक्षण करूया..

आमची संकल्पना — “समुद्र : जीवनाचा अथांग सागर”..
यावर्षी आम्ही Ocean Theme सादर केली आहे. आमच्या सजावटीतून समुद्रातील जैवविविधता, निसर्गाचे सौंदर्य आणि समुद्री जीवांचे महत्त्व दाखवले आहे.
आमच्या सजावटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण डेकोरेशन हाताने तयार केले असून, टाकाऊ व खराब वस्तूंचा पुनर्वापर केला आहे. यातून “Waste to Wonder” हा संदेश दिला आहे. तसेच, आम्ही आमची एकही परंपरा सोडलेली नाही. सर्व पारंपरिक पद्धती जपून, लक्ष्मीचे पारंपरिक स्वरूप जसेच्या तसे ठेवले आहे. आधुनिक Ocean Theme सोबत परंपरेचा सुंदर संगम साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नाव: रुद्रवार परिवार
गाव: नांदेड






