ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शेअर मार्केटमध्ये नगर शहरात सीएची 15 लाख 25 हजार रूपयांची फसवणूक

अहिल्यानगर मधील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका सनदी लेखापालाची (सीए) 15 लाख 25 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अक्षय ज्ञानेश्वर दारकुंडे (वय 30, रा. पारगाव भातोडी, ता. अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या सनदी लेखापालाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (16 सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत संजय वाघमारे (वय 25, रा. महेशनगर, बाराबाभळी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

फिर्यादी दारकुंडे हे सनदी लेखापाल असून सावेडी परिसरात त्यांचे कार्यालय आहे. त्यांच्या मित्रामार्फत सन 2022 मध्ये अनिकेत वाघमारे याच्याशी ओळख झाली. अनिकेत शेअर मार्केटमध्ये काम करीत असल्याचे सांगत असल्याने त्याने काही दिवस दारकुंडे यांच्या कार्यालयात ये-जा केली. यावेळी आपण चांगले शेअर ट्रेडिंग करीत असल्याचे सांगून त्याने विश्वास संपादन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीत अनिकेतने वैयक्तिक अडचण असल्याचे सांगत दारकुंडे यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात 6 लाख 25 हजार रूपये घेतले. हे पैसे लवकर परत देण्याचे सांगून त्याने नोटरी करून दिली तसेच सुरक्षेसाठी चेक दिले. मात्र, बराच कालावधी उलटूनही पैसे परत मिळत नसल्याने दारकुंडे यांनी मित्र विशाल सासवडे यांच्यासह अनिकेतचे वडील संजय गुलाब वाघमारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पैसे देण्याचे आश्वासन दिले. काही दिवस थांबून देखील त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान, दारकुंडे यांनी अनिकेतकडे पैशांबाबत विचारणा केली असता, त्याचे शेअर मार्केट खाते फ्रीझ झाले असून त्यामध्ये तब्बल नऊ कोटी रूपये अडकले आहेत, असे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावर विश्वास ठेवून दारकुंडे यांनी आणखी नऊ लाख रूपये अनिकेतच्या एचडीएफसी बँक खात्यावर पाठविले. मात्र त्यानंतर देखील पैसे मिळाले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे