ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील उपनगरातील एका कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या महिला वॉशरूममध्ये शिरून एका विवाहित महिलेवर अत्याचार

अहिल्यानगर मधील उपनगरातील एका कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या महिला वॉशरूममध्ये शिरून एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (15 सप्टेंबर) रात्री घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने (वय 22) बुधवारी (16 सप्टेंबर) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून देविदास खराद (रा. शनिधाम रोड, भारत बेकरीच्या मागे, बोल्हेगाव) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या कुटुंबाचा कपड्यांचा व्यवसाय असून उपनगरातील कॉम्प्लेक्समध्ये महिलांच्या कपड्यांचे दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्था आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास महिला तिच्या सासूसोबत कपड्यांच्या दुकानात काम करीत होती. यावेळी ती कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या महिला वॉशरूममध्ये गेली. वॉशरूममध्ये प्रवेश करून दरवाजा बंद करीत असतानाच देविदास खराद याने दरवाजा ढकलून आत प्रवेश केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर त्याने वॉशरूमचा दरवाजा आतून बंद करून महिलेचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या घटनेनंतर काही वेळाने महिलेचा पती व दीर तेथे आले. त्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडला. दरवाजा तुटल्यानंतर संशयित तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पकडले. मात्र, हाताला झटका देऊन संशयित पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे