गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र
२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती, गणेश भेळचा अनोखा उपक्रम
पुणे

पुण्यातील प्रसिद्ध खाद्यब्रँड ‘गणेश भेळ’ने यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कल्पकतेने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

खवैय्यांच्या अत्यंत आवडीच्या असलेल्या तब्बल २१ हजार पाणीपुरींच्या पुऱ्यांचा कलात्मक वापर करून तब्बल १३ फूट उंचीची भव्य आणि देखणी गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे.
खाद्यपदार्थांचा असा कल्पक आणि अनोखा वापर करून बाप्पाचे विलोभनीय रूप साकारण्याचा हा प्रयोग शहरात प्रचंड चर्चेचा विषय ठरला असून, या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.




