ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शाळकरी विद्यार्थ्यांच्या दिंड्यांनी नगर शहर दुमदुमले.

अहिल्यानगर

आषाढी एकादशी निमित्त शाळांना सुट्टी असल्याने बहुतेक शाळांनी  शाळकरी विद्यार्थ्यांच्या दिंड्या ची मिरवणूक काढून विठ्ठल नामाच्या जयघोष शहरातील सर्व रस्ते फुलून गेले होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील दादा चौधरी विद्यालय, मेहेर इंग्लिश स्कूल, समर्थ विद्यामंदिर आणि इतर शाळांनी ही शाळकरी मुलांच्या दिंड्यांचे आयोजन केले होते..

नऊवारी साडीतील मुली आणि वारकऱ्यांच्या पारंपारिक देशातील मुले यांनी नगरचे रस्ते फुलून गेले होते. या दिंड्यांमध्ये टाळकरी लेझीम पथके आणि फुगड्यांचे डाव रंगले होते. तर अनेक शाळांच्या दिंड्यांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान केलेली मुले सहभागी झाली होती.

शहरातील मेहेर इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकलिंग सहज दिंडीत सहभाग नोंदवला प्रत्येक सायकलीवर समाज प्रबोधनात्मक घोषवाक्य आणि पर्यावरण बचाव असे फलक लावलेले होते.

मेहेर इंग्लिश स्कूलचे स्कूल कमिटी चेअरमन जगदीश झालानी आणि मुख्याध्यापिका अनुरीता झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीने या सायकल दिंडीची सुरुवात करण्यात आली.

शहरातील सर्वच रस्ते विठ्ठल नामाच्या जयघोषाने आणि भगव्या पताकांनी सजल्यासारखे दृश्य दिसत होते. त्यामुळे अवघे शहरच पांडुरंगमय झाल्याचे दिसत होते. त्यातच जोरदार पावसाच्या सरीने शाळकरी वारकरी भक्तीरसात नाव ऊन निघाल्याचे चित्र शहरभर दिसत होते.

या शाळकरी दिंड्यांसाठी विविध शाळांचे शिक्षक पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन तेही मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

चितळे रस्त्यावरील शिशुविहार शाळेतील चिमुकल्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विठ्ठल रखुमाई आणि वारकऱयांच्या पेहरावात छोटी मुले सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे