ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बालक मंदिर महिला मंडळ शाळेने आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण दिंडी, निर्मल वारी, स्वच्छता दिंडीचे आयोजन..

अहिल्यानगर

बालक मंदिर महिला मंडळ शाळेने आषाढी एकादशी निमित्त पर्यावरण दिंडी, निर्मल वारी, स्वच्छता दिंडीचे आयोजन केले होते.

दिल्लीगेट येथील बालक मंदिर महिला मंडळ शाळेपासून खाकीदास बाबा मठापर्यंत दिंडी काढली. शाळेत दिंडी पूजन व औक्षणासाठी सौ रोहिणीताई सचिन पुंडलिक व सौ नीलम अभिनंदन ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले सर्व शिक्षिकांनी या स्वच्छता व पर्यावरण दिंडीचे पूजन करून विद्यार्थ्यांसह निसर्ग संवर्धनासाठी संकल्प केला . विद्यार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी उत्कृष्ट घोषवाक्ये धरलेले फलक उंच धरून परिसरात या दिंडीद्वारे जागृती निर्माण केली .यानंतर खाकीदास बाबा मठात विद्यार्थ्यांनी रिंगण केले. यात विशेष आकर्षण म्हणजे भागवत संप्रदायाची ध्वजा हातात धरलेला वारकरी अश्वावर आरूढ होऊन ३ प्रदक्षिणा पूर्ण केल्या .

मुलामुलींनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून हातात टाळ घेतले होते.छोट्या मुलींनी डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठल नामाचा गजर केला. तसेच मुलांनी भगवी पताका खांद्यावर घेऊन दिंडीत सहभाग घेतला.

फुलांनी सजवलेल्या पालखीत विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवली होती . तुला साद आली या विठ्ठल भक्तीगीतावर सर्व विद्यार्थी वारकऱ्यांनी रिंगणात सुंदर नृत्य सादर केले . मुलींनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

महिला मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी श्री मिश्रा आणि श्री हासे गुरुजींतर्फे विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला .

या दिंडी सोहळ्यासाठी बालक मंदिर महिला मंडळ शाळेच्या सर्व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे