ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गंगा सागर पश्चिम बंगाल येथे राष्ट्रीय गणेश पूजा संपन्न

अहमदनगर येथील सहजयोग्यांची कोलकत्ता गंगा सागर येथील गणेश पूजेस उपस्थिती

प. बंगाल येथील गंगा सागर या तीर्थ स्थळी प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग नॅशनल ट्रस्ट च्या वतीने राष्ट्रीय गणेश पूजा संपन्न झाली या पूजेस संपूर्ण भारतातून सहजयोगी उपस्थित होते.

गंगा सागर येथे दिनांक 6,7 व 8 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय श्री गणेश पूजेस भारतातील सर्व राज्यातून सहजयोगी मोठया प्रमाणात उपस्थित होते.या तीन दिवसात श्री गणेश पूजा, हवन, संस्कृतीक कार्यक्रम व सेमिनार चर्चा सत्र पार पडले. या मध्ये अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने भजने सादर करण्यात आली.

या सेमिनार ला अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरासह संगमनेर, कोपरगाव मधील सहजयोगी उपस्थित होते. या सेमिनार साठी अहमदनगर जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, अंबादास येन्नम, संगमनेर येथील भाऊसाहेब घुले, सुभाष वाकचौरे कोपरगाव येथून उल्हास गवारे, कुंडलिक ढाकणे, मनोज वाकचौरे, चंद्रकांत रोहकले, दिलीप कार्ले, डिके साहेब व इतर सहजयोगी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे