ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात मोहरम उत्सव काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवल्यास कारवाई पोलिसांची नोटीस

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात दि. 17 जून 2026 ते दि. 26 जून 2026 या कालावधीत मोहरम उत्सव साजरा होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व उत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावा, यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये सोशल मीडिया व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना नोटीस बजावली आहे.

ॲडमिनना 4 महत्त्वाच्या सूचना

पो.नि. देशमुख यांनी नोटीसमध्ये सोशल मीडिया ऑपरेटर व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सदस्यांना खालील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

1. आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट नको सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट तसेच वादग्रस्त मजकूर लिहून व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करू नये.

2. तेढ निर्माण करणारी पोस्ट टाळा सोशल मीडियावर दोन गटात, दोन समाजामध्ये, जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करू नये.

3. अफवांवर लक्ष ठेवा आपले ग्रुपवर कोणतीही अफवा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर प्रसारित होणार नाही याची ॲडमिन म्हणून खबरदारी घ्यावी.

4. जातीय तेढीला प्रतिबंध जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे छायाचित्र अथवा मजकूर प्रसारित करू नये.

उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई  – नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोहरम उत्सव काळात शांततेस व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित ॲडमिनला जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल.


सदरची नोटीस पो.नि. नितीन देशमुख यांनी दि. 17 जून 2026 रोजी जारी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे