ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या सहकार्याने सत्या फाउंडेशन आणि झेप फाउंडेशन पुणे मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर वाघजाई नगर कात्रज पुणे येथे संपन्न

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

22 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे,आंबेगाव खुर्द, वाघजाई नगर येथील तिरंगा चौकामध्ये संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या सहकार्याने सत्या फाउंडेशन व झेप फाउंडेशन पुणे मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात आले.

यावेळी वाघजाई नगर भागातील तसेच सच्यामाता मंदिर, संतोष नगर रंगा शेठ चौक, राधाकृष्ण मंदिर या भागातील नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला याच्यामध्ये या भागातील वय वृद्ध व गरजू व्यक्तीनी डोळे तपासणी करून घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या मार्फत आरोग्य सेवेतील विविध सोयी, मोफत दिल्या जातात याची माहिती देण्यात आली याच बरोबर डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन हे सुद्धा फ्री मध्ये केले जाते .

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कडून डॉ.शनीकुमार जैस्वाल प्रवीण डवरे सर त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजलीताई जाधव, झेप फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कांता भाऊ राठोड ,संस्थापक सचिव शिवाजी मुसळे, पदाधिकारी नवनाथ शिंदे, अक्षय पवार तसेच या भागातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे