अन्वी घाटगे ५ वर्षाच्या चिमूरडीने १२५०० फूट उंच केदारकंठा शिखर शिवजयंती निमित्त सर केले..
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

हिमालय पर्वत रांगेतील केदारकंठा उत्तराखंड राज्यातील हे समुद्रसपाटीपासून 12500 फूट उंचीचे बर्फाच्छादित शिखर तेथील तापमान 15 अंश सेल्सिअस आहे अशा तापमानात 5 वर्षाच्या अन्वी घाटगे या कोल्हापूरच्या छोट्या गिर्यारोकाने शिवजयंती दिवशी सर करून शिवध्वज फडकवला .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. केदारकंठा शिखर चढाई करून परत साकी् येथे पोचणारी अन्वी सर्वात लहान गिर्यारोहन आहे .
अन्वी हिचा हा 6 वा जागतिक विक्रम आहे लवकरच याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. अन्वी ला या विक्रमाबाबत शिवा अँडव्हेचरचे संस्थापक प्रमोद राणा ,युवा वर्ल्डचे तेजस जीवकाटे यांनी प्रमाणपत्र दिले.
यावेळी प्रा. अनिल मगर, प्रशिक्षक व आई अनिता घाटगे वडील चेतन घाटगे ,मनोज राणा आधी सहभागी होते .मुलीला मुलाप्रमाणे वागवले पाहिजे कोठेही मुलीला कमी समजू नये याचे उदाहरण म्हणजे अन्वी घाटगे आहे.
या गिर्यारोहकाला घडवणाऱ्या मातेला त्रिवार सलाम