ब्रेकिंगमहाराष्ट्र
रुपाली चाकणकर मुलींच्या वसतीगृहात
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली आणि तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. मुलींशी आणि वसतीगृहाच्या अधिकारी – कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
याप्रसंगी महिला आयोगाच्यावतीने सायबर गुन्हे आणि महिलांशी संबंधित गुन्ह्यांबाबत मुलींची जनजागृती करण्यात आली. स्वतःला कसे सुरक्षित राखावे याबाबत मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांच्या सुरक्षितते विषयीचे कायदे, महिला आयोगाचे कामकाज, महिलांच्या सबलीकरणासाठीच्या शासनाच्या योजना याची सविस्तर माहिती मुलींना देण्यात आली.