आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
अहमदनगर

दरवर्षी ३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमांद्वारे प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सौ. गोदावरी किर्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील अनावश्यक प्लास्टिक पिशव्या शाळेमध्ये जमा करून त्यांचा वापर न करण्याचा सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रण घेतला.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश प्लॅस्टिक पिशवीचा वापर कमी करणे, तसेच यापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. यासंदर्भातील अधिक माहिती शाळेच्या शिक्षिका सौ अश्विनी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणासंदर्भात होणारे दुष्परिणाम सांगितले.
याप्रसंगी बोलताना प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सौ. गोदावरी किर्तानी यांनी सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी व कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. राम मेंघानी, उपाध्यक्ष श्री. रूपचंद मोटवानी, सचिव श्री. गोपाल भागवानी, खजिनदार श्री. दामोधर माखिजा, विश्वस्त श्री. महेश मध्यान, श्री. सुरेश हिरानंदानी, श्री. राजकुमार गुरुनानी, श्री. हरीष मध्यान तसेच शाळेच्या प्राचार्या गीता तांबे व उपप्राचार्या सौ. कांचन पापडेजा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेत राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशवी मुक्ती या उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.