ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

जिल्हा परिषदचे माजी सदस्य भाजपात प्रवेश

अहमदनगर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना ग्राम पंचायत निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आता रोहित पवार यांचे आणखी एक कट्टर समर्थक भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. मागच्याच आठवड्यात जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश केला. जवळा ग्रामपंचायत ही स्थानिक आघाडीने जिंकली होती. सरपंच सुभाष आव्हाड यांनी राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला होता. युवा नेते प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता.

आता रोहित पवार यांचे कट्टर समर्थक परमवीर पांडुळे यांनी भाजप आमदार राम शिंदे यांची भेट घेतली आहे. परमवीर पांडुळे हे मिरजगांव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. पांडुळे यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पांडुळे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यासाठी हा धक्का आहे. “आपला तो आपला, राम शिंदे यांनी सहकार्य केले. मात्र मी त्यांची परतफेड करू शकलो नाही. या पुढे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार” असं परमवीर पांडुळे म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे