ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सशक्त महिला उदयोग व शॉपिंग महोत्सव – २०२३

अहमदनगर प्रतिनिधी

सशक्त महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सशक्त महिला उद्योग महोत्सव येत आहे केडगाव मधे..

आम्ही चार मैत्रिणींनी मिळून सशक्त महिला उद्योग स्थापन केली . ज्या महिला घर सांभाळून आपल्या कलेसाठी किंवा व्यवसायासाठी इतक्या आवडीने सुबक चविष्ट पदार्थ किंवा सुंदर अशा वस्तू बनवत आहे. त्या वस्तू किंवा पदार्थ यांना वाव मिळण्यासाठी योग्य अशी ओळख मिळण्यासाठी आम्ही सशक्त महिला उद्योग ही कल्पना सुचली.

आमचे हे शाॅपिंग फेस्टिव्हल भरवण्याचे पहिलेच वर्ष आहे.. इथुन पुढे दिवाळी, दसरा या कालावधीत ही आम्ही शाॅपिंग फेस्टिव्हल भरवणार आहे. त्या बरोबरच महिलांना सपोर्ट करत त्यांना पुढे येऊन आपल्या प्रोडक्ट्स ची पब्लिसिटी कशी करायची याचे ट्रेनिंग ही देणार आहे. महिलां एकत्री करणा साठी वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत.

आता येत्या रविवार पासुन दिनांक १०, ११,१२ सप्टेंबर असे ३ दिवस वेळ १० ते ९ हे शाॅपिंग फेस्टिव्हल भरवणार आहे.

सायंकाळी ०४ वाजता भव्यदिव्य शाॅपिंग फेस्टिव्हल चा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

नियम व अटी 

१) केडगाव मधील लोकांसाठी १००० /- रुपये भाडे आहे. आणि बाहेरच्या भागातील लोकांसाठी १५०० /- रुपये आहे .

२) ३० पेक्षा जास्त स्टॉलस्.

३) आम्ही फक्त टेबल , २ खुर्ची  देणार आहोत.

४) स्टाॅल आदल्या दिवशी संध्याकाळी ताब्यात मिळेल.

५) लाईट कनेक्शन ( फ्रीज साठी, किंवा इतर कोणत्याही उपक्रमांसाठी ) जास्त लागत असल्यास आधी कल्पना द्यावी.. त्याचे वेगळे चार्जेस असतील.

यांमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहे. घरगुती व्यवसाय करणारे महिलांच्या हाताने बनवलेल्या सुबक वस्तु , मातीची भांडी, चाट, आयुर्वेदिक ब्यूटी टिप्स महाराष्ट्रीयन डिशेस पापड लोणचे , ज्वेलरी, गिफ्ट आयटम आणि त्या सोबत  बाल गोपालांसाठी खेळ, गेम्स , गाणी, डान्स, रॅम्प वॉक अशाच अनेक स्पर्धा आयोजित केल्या आहेत.यासारखे बरेच काही पहायला अनुभवायला व खरेदी करायला मिळेल.

आमची आयोजक टिम

१) कु.धनश्री पोखर्णा युवा उद्योजिका.

२) सौ. सारीका सिद्धम संचालिका लकाकी फाऊंडेशन संचलित कुटूंब वृद्धाआश्रम .

३) सौ.सुरेखा पोखर्णा, सौ. दीपा सोनी, सौ. अर्चना झरेकर.

४) कु. नंदिनी नाटेकर युवा उद्योजिका.

५) मिडिया पार्टनर – AR न्यूज च्या मुख्य संपादिका सौ श्रुती बत्तीन-बोज्जा.

स्टॉल बुकिंग साठी त्वरीत संपर्क साधा. 9595959327, 9370 158 611. स्टाॅल बुकींग चालू झाली आहे..

स्थळ:- छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय. अंबिका बसस्टॉप केडगांव अ.नगर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे