ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

‘वैभव आर्ट्स’ च्या संचालिका नाशिकच्या अपर्णा धामणे यांच्याशी दिलखुलास गप्पा

नाशिक

नाशिकच्या अपर्णा धामणे यांचं आयुष्य 16 मार्च 2023 रोजी अचानक बदललं. पतीच्या निधनाचा मोठा धक्का त्यांना सहन करावा लागला. या दुःखातून सावरणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं; मात्र कुटुंबाच्या आधाराने त्यांनी पुन्हा स्वतःला उभं करण्याचा निर्णय घेतला.

पूर्वी अपर्णा या कळवण येथे अकाउंटंट म्हणून नोकरी करत होत्या. पतीच्या निधनानंतर त्या माहेरी नाशिकला आल्या. मानसिकदृष्ट्या सावरण्यासाठी आई आणि भावाने त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

भावाला आधीपासूनच शोभेच्या वस्तू बनवण्याची आवड होती आणि अपर्णांनाही कलेची आवड होती. त्यामुळे 2 जून 2024 रोजी ‘वैभव आर्ट्स’ या हँडमेड वस्तूंच्या व्यवसायाची सुरुवात झाली. पतीच्या आठवणी कायम सोबत राहाव्यात आणि त्यांचं नाव पुढे जावं, यासाठी व्यवसायाला त्यांनी पतीचंच नाव दिलं.

आज वैभव आर्ट्समध्ये अपर्णा स्वतःच्या हाताने विविध कलात्मक आणि उपयोगी वस्तू तयार करतात. घराच्या सजावटीपासून सण-समारंभातील खास वस्तूंपर्यंत अनेक प्रकारची प्रॉडक्ट्स त्या तयार करतात.

त्यांच्या व्यवसायातील खास प्रॉडक्ट्समध्ये इकोफ्रेंडली कार्डबोर्ड गणपती मखर, MDF आणि Acrylic Home Decor, Customized Nameplates, हळद-मेंहदी Platers आणि विविध डिझाइन्सचे Fridge Magnets यांचा समावेश आहे.

ग्राहकांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार Customized Products तयार करण्यावरही त्यांचा भर असतो. प्रत्येक वस्तू स्वतः हाताने तयार करत असल्याने त्यामध्ये कलाकुसर आणि वैयक्तिक स्पर्श पाहायला मिळतो.

एकेकाळी अकाउंटंट म्हणून नोकरी करणाऱ्या अपर्णा आज स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहेत. दुःखातून बाहेर पडण्यासाठी सुरू केलेलं हे काम आज त्यांची स्वतःची ओळख बनलं आहे. कुटुंबाची साथ आणि कलेची आवड यामुळे त्यांनी हा प्रवास पुढे नेला. मात्र या व्यवसायामागची सर्वात मोठी भावना एकच.. आपले पती वैभव यांचं नाव कायम पुढे जावं आणि त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहाव्यात.

म्हणूनच ‘वैभव आर्ट्स’ हे त्यांच्यासाठी केवळ व्यवसायाचं नाव नाही, तर पतीशी जोडलेली एक भावनिक आठवण आहे. मोठ्या दुःखातून सावरत त्यांच्या नावाला पुढे नेण्यासाठी उभा केलेला हा व्यवसाय आज अपर्णाताईंच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

पत्ता: – विराट पार्क, ICICI बँकेजवळ, चार्वाक चौक रोड, इंदिरानगर, नाशिक.. संपर्क – 93708 02970..

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल मुख्य संपादिका श्रुती बत्तीन मॅडम कडून अपर्णा ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे