ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू…

आज १८ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर तिथे जमलेल्या मराठी जनांना संबोधित केलं. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे..

प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू. सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर?

३) संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रचंड लढा लढला गेला, मुंबईला वेगळे करण्याचा डाव होता तो कोणाचा होता? तर तो काही गुजराती नेते, गुजराती व्यापाऱ्यांचा होता. आचार्य अत्रे यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की वल्लभभाई पटेल ह्यांनी महाराष्ट्राला मुंबई देण्यास प्रथम विरोध केला. आम्ही देशाचे लोहपुरुष म्हणून तुमच्याकडे आदराने पाहत होतो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ? पुढे मोरारजी देसाईंनी गोळीबार करून मराठी माणसांना ठार मारलं होतं. गेली अनेक वर्ष यांचा मुंबईवर डोळा आहे.

हे चाचपडून बघत आहेत तुम्हाला… हिंदी भाषा आणून बघायची, मराठी माणूस पेटतोय का बघायचं आणि तो शांत बसला तरी हिंदीची सक्ती करायची. हिंदी भाषा सक्ती ही पहिली पायरी आहे, त्यावर मराठी माणूस शांत बसला तर मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला जोडायची हा खरा डाव आहे. त्यामुळे राज्यातील मराठी माणसांनी सावध राहण्याची गरज आहे. हा डाव अगदी आधीपासूनचा आहे, पूर्वी तो उघडउघड होता, आता थोडा लपूनछपून प्रयत्न केला जातो.

४) जगातील एक मोठं सत्य आहे. तुमची भाषा मेली आणि तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्हाला कोणीही विचारणार नाही… तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन टिकवणं महत्वाचं आहे.

५) फक्त मुंबईत काही झालं तर हिंदी चॅनल्स अजेंडा चालवतात. ही कसली हिंदी चॅनेल्स. ही तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळाने सुरु करतील, ‘राज ठाकरेने उगला जहर’… फक्त मुंबईत आणि महाराष्ट्रात काही झालं की कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनातील रागातून ही लोकं पेटून उठतात.

२०१८ साली २० हजार बिहारी लोकांना गुजरात मधून हाकलून लावले, तेव्हा बातम्या नाही झाल्या. ज्याने हाकलले तो आज भाजप मध्ये आमदार आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा बिहारी लोकांना हाकलले, एकही बातमी झाली नाही. इथे महाराष्ट्रात एका मिठाईवाल्याच्या कानाखाली बसली तर देशभर बातम्या?

६) मराठी भाषेला अडीच तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. हिंदीला २०० वर्षांचाच. अभिजात भाषेचा दर्जा मिळायला साधारण १४०० वर्षे लागतात. म्हणजे हिंदीला हा दर्जा मिळायला अजून १२०० वर्षे आहेत, ती भाषा आमच्या मुलांनी सक्तीने का शिकायची?

७) हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील अनेक मातृभाषांसह २५० भाषा हिंदीने मारल्या. अगदी हनुमान चालिसासुद्धा अवधी भाषेत आहे, हिंदी नव्हे. तिथल्या लोकांना उलट ही गोष्ट सगळ्यात आधी समजायला हवी.

८) भाषा कोणतीही वाईट नसते, पण ती भाषा सक्तीने लादणे खपवून घेणार नाही. आमच्यावर लादणार असाल तर आम्ही नाही बोलणार. लहान मुलांवर तर नाहीच लादू देणार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे