ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सहजयोग ध्यान साधनेने विदयार्थ्यांचे कला गुणांना वाव मिळतो- मेजर उत्तम बेरड

अहिल्यानगर

छत्रपती शाहू सैनिक स्कुल, नांदेड च्या विद्यार्थ्यांना आत्मसाक्षात्कार कार्यक्रम संपन्न

संस्कृती संवर्धन मंडळ च्या वतीने छत्रपती शाहू सैनिक स्कुल,शारदा नगर, सगरोळी, नांदेड मधील विदयार्थ्यांना प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार अहिल्यानगर च्या वतीने कुंडलिनी शक्ती जागृती कार्यक्रम सहज भुवन अहिल्यानगर येथे घेण्यात आले. या वेळी सहजयोग परिवाराच्या वतीने मेजर उत्तम बेरड यांनी सहजयोगाची माहिती देतांना सांगितले की, सहजयोग ध्यान साधना ही जगातील 140 देशापेक्षा जास्त देशा मधील साधक ही ध्यान साधना करीत असून याचा फायदा लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच होत असून सहजयोग ध्यान साधनेने विदयार्थ्यांचे सुप्त कला गुणांना वाव मिळतो.

या वेळी मा. जिल्हा समन्व्यक श्रीनिवास बोज्जा यांनी कुंडीलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम घेतला. या वेळी सहजयोग परिवारातील कैलास शहाणे, मनोज चव्हाण, राजू मंचे, हैद्राबाद येथून आलेले सहजयोगी रघु, मनोज बोज्जा, वासंती वैद्य, संजय वैद्य आदी उपस्थित होते.

संस्कृति संवर्धन मंडळ संचालित राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी येथील इयत्ता नववी वर्गाची शैक्षणिकसहल मधील 75 विद्यार्थी आणि शिक्षकवृंद श्री विठ्ठल भंगे, श्री गंगाधर फुलारी, श्री विठ्ठल पंढरे, श्री दिवाकर फडके, श्रद्धा कलेपवार, अनुराधा पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी छत्रपती शाहू सैनिक स्कुल विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी सहजयोग परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या आत्मसाक्षात्कार कार्यक्रम घेतल्या बद्दल आभार व्यक्त केले व विदयार्थ्यांकडून रोज नित्य नियमाने सहजयोग ध्यान करून घेण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे स्वागत धनंजय मानवेलीकर यांनी केले तर आभार मयूर थिगळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत


Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे