ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत १ ऑक्टोबरला “एक तारीख” “एक घंटा महाश्रमदानाचे” आयोजन

अहमदनगर

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक तास श्रमदान मोहीम राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून,सर्व नागरिकांनी,स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन, आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबवून महात्मा गांधीजींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. श्रमदान मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात गावागावात सार्वजनिक परिसर,शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,आरोग्य उपकेंद्र, मंदिरे,बाजार तळ,बस स्थानक,नदी किनारे,तलाव ठिकाणी तसेच इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेसाठी जागा निवडतील. ही सर्व ठिकाणे नकाशावर उपलब्ध असतील, https://swachhatahiseva. com या सिटिझन पोर्टलवर उपलब्ध पर्यायांद्वारे पाहता येतील आणि निवडता येतील.

याद्वारे नागरिक स्वच्छता अभियानाच्या ठिकाणी त्यांचे फोटो क्लिक करू शकतील आणि ते या पोर्टलवर अपलोड करू शकणार असल्याची माहिती समर्थ शेवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दिली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे