महिलांनी सहजयोग आत्मसात केल्यास कौटुंबिक कलह दूर होतील – डॉ. निलिमा निघुते
अहिल्यानगर

माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न..
भिंगार येथील माजी सैनिकांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे वतीने शहीद स्मारक, सत्यभामा मंगल कार्यालय, शांती नगर, भिंगार येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे नियोजन केले होते, या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे संगमनेर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व लोटस इंग्लिश मेडीयम स्कुल चे संस्थापिक सौ. निलिमा निघुते, आ. शिवाजी कर्डीले यांच्या पत्नी सौ. अलकाताई कर्डीले, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा, सौ. संगीता केदार, रूट्स प्री स्कुल चे संचलिका सौ. अपेक्षा परदेशी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी हळदी कुंकू निमित्त प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने आलेल्या महिलांना कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी बोलतांना डॉ. निघूते म्हणाले सहजयोग हा अत्यंत सोपा योग असून प्रत्येकाला एकत्रित बसून सहकुटुंब करता येणारा योग आहे. या योगामध्ये कोणताही जातीधर्म नसून महिलांनी हा योग आत्मसात केल्यास घरातील इडा पीडा टळतील, घरातील दोष दूर होऊन कुटुंबामध्ये सुख शांती समाधान लाभेल, कौटुंबिक कलह दूर होतील यासाठी महिलांनी सहजयोग आत्मसात करावा.
या वेळी सौ. अल्काताई कर्डीले म्हणाले की या भागात मोठया प्रमाणात कुटुंबाचा राहिवास असून महिलांची मोठी एकी या गर्दी वरून दिसून येते, नक्कीच भविष्यात तुम्हांला कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर आम्ही सहकार्य करू. मा. नगरसेविका वीणा बोज्जा यांनी आलेल्या महिलांना हळदी कुंकू च्या शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे वीर नारीनां समजपासून दूर ठेवले जात असल्यामुळे या नारीना या कार्यक्रमांस बोलवून सर्वांचे उचित सन्मान या संस्थेच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिमा शेळके यांनी केले, स्वागत सौ.विमलताई गुंड यांनी केले तर आभार सौ.सीमाताई वाघ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.मंगलताई चौधरी, सौ. वंदनाताई फरताडे, सौ. उषाताई गपाट, सौ. छायाताई ढाकणे, सौ. कविता कराळे, सौ. आशाबी शेख, सौ. विजयाताई ढाकणे, सौ. राधाताई आर्ले, सौ. वंदनाताई रनसिंग, सौ. राजश्रीताई सानप व इतर अनेक महिलांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास 500 पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती लावली.