ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील चास (ता. अहिल्यानगर) शिवारातील आडसुळ कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

प्रशांत दत्तात्रय जाधव (वय 19, रा. सारंगवस्ती, निमगाव वाघा, ता. अहिल्यानगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी प्रशांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. साहिल शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) व त्याच्या सोबतच्या अनोळखी दोन मित्रांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रशांत जाधव हा आपल्या मित्रासोबत महाविद्यालयाच्या पटांगणात बोलत जात होता. त्यावेळी संशयित आरोपी साहिल शेवाळे याने तिथे येत तू मला शिवी का दिली असे म्हणत हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

फिर्यादीने वाद टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्याला हॉटेलवर येण्याची धमकी दिली. यानंतर प्रशांत हा महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये डबा आणण्यासाठी गेला असता, साहिल शेवाळे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र तिथे आले. तुला भांडण करायचे आहे का? असे विचारत त्यांनी वाद उकरून काढला.यावेळी साहिलच्या एका साथीदाराने कमरेला लावलेला चाकू काढून प्रशांतवर वार केला. तसेच साहिल आणि त्याच्या दुसर्‍या मित्राने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या प्रकरणी प्रशांत जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार जंबे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे