ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यापीठाच्या सर्व विद्या शाखांमध्ये मराठी अनिवार्य करा

पुणे

मराठी ही ज्ञानभाषा, उद्योगाची आणि रोजगाराची भाषा होण्यासाठी विद्यापीठीय स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या सर्व विद्याशाखेत मराठी हा विषय अनिवार्य करण्याचा ठराव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला.

विद्यापीठ स्तरावर असा ठराव करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.

अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास मंडळाची बैठक विद्यापीठात झाली. या बैठकीला अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, सदस्य डॉ. सुधाकर शेलार, डॉ. प्रमोद आंबेकर, डॉ. शांताराम चौधरी, डॉ. पोर्णिमा घोडके, डॉ. सुरेश जाधव, राजीव बर्वे, डॉ. शीतल गोर्डे पाटील, डॉ. शोभा तितर, संजय ऐलवाड आदी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात मातृभाषेकडे दुर्लक्ष केेल जात आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी भाषेची व्याप्ती वाढवण्यासाठी महाविद्यालयीन, विद्यापीठीय स्तरावरील प्रत्येक विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना मराठी शिकवली जावी.

त्यामुळे ती ज्ञानभाषा होण्यासह व्यवसायाची, उद्योगाची भाषा होण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर सर्व विद्याशाखांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे