ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांचे होणार सर्वेक्षण

अहमदनगर

नगर महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण  सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे.

मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश मनपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत. दरम्यान, गेल्या २० वर्षात शहरात सर्वेक्षण झालेले नाही. महापालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होऊन पुनर्मल्यांकन करणे अपेक्षित आहे. आता हाती घेतलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे व पुनर्मूल्यांकनामुळे शहरातील सर्व मालमत्तांना कर आकारणी होईल.

मार्च महिन्यानंतर नव्या मोजमापांच्या नोंदीनुसार कर आकारणी केली जाणार आहे. यातून महापालिकेचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास प्रशासक डांगे यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे