ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नामांकित भेळ कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई बळावली..

अहिल्यानगर

शहरातील एका नामांकित भेळ कंपनीच्या कारभारावर आणि कामगारांच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या या भेळ कंपनीतील एक कामगार अत्यंत अस्वच्छ, आजारी आणि मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रकार एका पोलीस कारवाईनंतर उघडकीस आला आहे.

या प्रकरणामुळे आवडीने भेळ खाणाऱ्या खवय्यांना मोठा धक्का बसला असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) कठोर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अधिकृत माहितीनुसार, काल मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास सदर नामांकित भेळ कंपनीतील एक कामगार आपल्या एका साथीदारासह मोटरसायकलवरून शनी चौक परिसरातून अत्यंत बेधुंद अवस्थेत जात होता. संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

यादरम्यान ग्रामीण रुग्णालयात सदर कामगाराची अधिकृत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो प्रचंड नशेमध्ये दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित कामगारावर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’  चा गुन्हा नोंदवला असून, मा. न्यायालयाकडून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अशा मद्यधुंद आणि आजारी व्यक्तींना कर्मचारी म्हणून कामावर ठेवणारी ही भेळ कंपनी नेमकी चालवली कशी जात आहे.? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. विशेषतः मोठ्या संख्येने येथे भेळ खाण्यासाठी येणाऱ्या कॉलेज तरुणी, महिला आणि लहान मुले या भेळ सेंटरमध्ये कितपत सुरक्षित आहेत? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत असून महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

येथील अस्वच्छ, आजारी आणि मद्यधुंद कामगारांमुळे अन्न सुरक्षेचे निकष पायदळी तुडविले जात असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा आस्थापनांवर ‘अन्न आणि औषध प्रशासन’ अर्थात (FDA) ने तातडीने धाड टाकून कठोर कारवाईची मागणी आता बळावली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे