ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अहिल्यानगर महापालिका निवडणुक पैशांचे वाटप,पैसे वाटणारे पोलिसांच्या ताब्यात

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामध्ये मतदारांना पैशांचे वाटप सुरू असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

पोलीस व भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेतली आहेत.

तोफखाना सांबरगल्ली परिसरात काही उमेदवारांकडून खुलेआम पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपच्या चारही उमेदवारांनी केला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच भाजप उमेदवारांनी तत्काळ तोफखाना पोलीस ठाणे आणि भरारी पथकाशी संपर्क साधत कारवाईची मागणी केली.

यानंतर पोलीस व भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेतली आहेत. सदर वाहने दोन दिवसांसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या भाजप विरुद्ध बहुजन समाज पाट अशी थेट लढत रंगली असून, निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजप उमेदवारांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे