ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

व्यवसायिकाला जिवे मारण्याची धमकी – योगीराज गाडे सह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर

नगर मधील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात सोशल मीडियावर (फेसबुक) टाकलेल्या एका पोस्टचा राग धरून नगरसेवकासह इतरांनी एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे अहिल्यानगर महापालिकेचे नगरसेवक योगीराज शशीकांत गाडे (रा. अहिल्यानगर) याच्यासह इतर वेगवेगळ्या १४ मोबाईल नंबर धारक व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत व्यावसायिक घनश्याम दत्तात्रय बोडखे (वय ४८, रा. बुऱ्हानगर, ता. अहिल्यानगर) यांनी तक्रार दिली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे