ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आकाशवाणी केंद्राला अहिल्यानगर नाव द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

अहिल्यानगर - अन्यथा आकाशवाणी केंद्राला टाळे ठोकणार - अभिजीत खोसे

आपल्या ऐतिहासिक शहराचे नामकरण अहिल्यानगर नावाने झालेले असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिकेनेही झालेल्या बदलाबाबत सर्वत्र माहीती दिलेली आहे.

तरी देखील नगर शहर व जिल्हयाचा उल्लेख करताना आकाशवाणीकडून जुन्या नावाचा उल्लेख केला जातो हि बाब योग्य नाही .राज्य व केंद्रसरकारनेही अहिल्यानगर नावाला अधिकृत मान्यता दिलेली आहे. तरी आता आपल्याकडूनही झालेल्या बदलाची नौद घेण्यात यावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहाय्यक निदेशक अभियांत्रिकी आकाशवाणी मानसी गारुडकर यांना निवेदनाद्वारे दिली असून आपल्या कार्यालयाच्या गेटवर सुद्धा अहिल्यानगर नावाचा उल्लेख होणे गरजेचे आहे. मात्र जुन्याच नावाने उल्लेख असून तातडीने बदलून घेण्यात यावे अन्यथा दोन दिवसांमध्ये नगर शहराचा आणि जिल्हयाचा उल्लेख आपल्या रेडीओमध्ये अहिल्यानगर न झाल्यास आपल्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल.

तरी पुढील उपाययोजना तातडीने करण्यात याव्या अन्यथा होणा-या परिणामांची जबाबदारी आपली राहिल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिला यावेळी जय भोंसले, केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, महेंद्र उपाध्ये, राजूनाना तागड़, तुषार यादव, मयूर सोमवंशी, रोहित सरना आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे