ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर जिल्ह्यात अन्न प्रशासन विभागाचे आठ दूध विक्री केंद्रांवर छापे..

अहिल्यानगर

दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न प्रशासनातर्फे राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत येथील अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी अहिल्यानगर शहरातील दुध विक्री करणार्‍या आठ डेअरींवर छापेमारी केली. कारवाईत दुधाचे 19 सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी केली जाणार असून, यात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरात दुधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविली गेली. येथील अन्न प्रशासनाच्या दोन निरीक्षकांनी अहिल्यानगर शहरासह सावेडी भागातील आठ डेअरीवर छापे टाकून पाऊचमधून व सुट्या स्वरूपातील दुधाचे नमुने घेतले. यामध्ये गाय व म्हैस यांच्या दुधाचे मिळून 19 नमुने घेण्यात आले आहेत. ते नाशिक येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीअंती त्यामध्ये भेसळ आढळून आल्यास संबंधित डेअरी मालकांविरूध्द कारवाई केली जाणार असल्याचे येथील अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

अहिल्यानगर शहरातील विशाल गणपती मंदिराजवळील गणेश घी डेपो, चर्च रस्त्यावरील कैलास डेअरी, सबजेल चौकातील राहुल डेअरी, डावरे गल्लीतील साई डेअरी, गुलमोहोर रस्त्यावरील सात्विक डेअरी, सावेडी उपनगरातील नायरा पेट्रोप पंपा जवळील समर्थ व त्रिमूर्ती डेअरी, गुलमोहर रस्त्यावरील कबीर केक बेकरी या ठिकाणांहून दुधाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तेथील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्यभर अन्न प्रशासन विभागाने राबविलेल्या मोहिमेत दुध विक्रेत्यांबरोबर संकलन केंद्रातील दुधाचे नमुने घेतले गेले. मात्र येथील अन्न प्रशासनाने फक्त दूध विक्री होणार्‍या डेअरीतूनच दुधाचे नमुने घेतले. संकलन केंद्रातील दुधाचे नमुने घेतले गेले नाही. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे यापूर्वी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. दरम्यान, यापुढील मोहिमेत संकलन करणार्‍या केंद्रांतून दुधाचे नमुने घेतले जातील, असे अन्न प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे