ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कर वसुलीसाठी मनपा उपायुक्त वैशाली शिंदे ॲक्शन मोडवर…११ लाखांची वसुली

अहिल्यानगर- सिद्धीबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गाळे भाडे, उपायुक्त वैशाली शिंदे यांनी साडे ११ लाख केले वसूल..

शास्ती माफीचा लाभ घ्या,अन्यथा कर न भरणाऱ्यांवर कारवाई होईल – उपायुक्त वैशाली शिंदे..

महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतले असून आयुक्त यशवंत डांगे यांनी 31 जानेवारीपर्यंत 100 टक्के शास्ती माफी जाहीर केली आहे त्या पार्श्वभूमीवर उपयुक्त वैशाली शिंदे यांनी महापालिकेच्या मार्केट विभागाच्या वतीने सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील १ ते 26 गाळेधारकांना भाडे भरण्याचे सांगितले, त्यानुसार सर्व गाळेधारकांनी ११ लाख 50 हजारचा वसुली कर भरत उर्वरित भाडे 31 मार्चपर्यंत भरण्याचे आदेश दिले तरी नगरकरांनी शास्ती माफीचा लाभ घेऊन आपला कर भरावा व महापालिकेला सहकार्य करावे अन्यथा कर न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त वैशाली शिंदे यांनी दिला..

सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गाळे भाडे मार्केट विभागाच्या वतीने गाळेधारकांकडून 11 लाख 50 हजार रुपयाचा धनादेश उपायुक्त वैशाली शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, मार्केट विभागप्रमुख सतीश पुंड, तुळशीराम जगधने, राम चाफे, बापू बेलेकर, आसाराम गुंड, शिवराम गवांदे, गाळेधारक उपस्थित होते.

अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता कराच्या थकबाकी वसूलीसाठी कडक पावलं उचलली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे