ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गणेशोत्सवात लालबागच्या राजाला किती दान मिळालं?

मुंबई - गणेशोत्सव अखेर संपला असून आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षाची आस लागली आहे. गणेशोत्सवात मंडपांकडे दर्शनासाठी वळणारे पाय आता कार्यालयांच्या दिशेने वळले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १० दिवस भाविकांसोबत घालवल्यानंतर लाडका बाप्पाने दि.१७ला आपल्या भक्तांचा निरोप घेतला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात पार पडली.

राजाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१८ला साडेदहा वाजेच्या सुमारास झालं. दरवर्षी लाडक्या बाप्पाला भरघोस दान देखील मिळालं आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाला किती दान मिळालं यावर आपण एक नजर टाकूया.

गणेशोत्सव अखेर संपला असून आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षाची आस लागली आहे. गणेशोत्सवात मंडपांकडे दर्शनासाठी वळणारे पाय आता कार्यालयांच्या दिशेने वळले आहेत. दुसरीकडे गणेश मंडळं आता पंडाल वैगेरे काढण्याचं काम करत आहेत. तसंच गणेश भक्तांनी पैसे, सोनं, चांदीच्या रुपात मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु आहे. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाचंही दानाचा मोजदाद पूर्ण झाली आहे.

लालबागचा राजा संपूर्ण देशात प्रसिद्ध

लालबागचा राजा फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्द आहे. गणेशोत्सवातील ११ दिवसांमध्ये येथे फक्त मुंबईच नाही तर देश, जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. फक्त सर्वसामान्यच नाही तर अमित शाह, अंबानी, शाहरुख खान असे सर्व क्षेत्रातले दिग्गज राजाच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी हजेरी लावतात. यादरम्यान भक्तांकडून लालबागचा राजाला भरभरुन दान केलं जातं. गणेशोत्सव सुरु असतानाच या दानाची मोजदाद सुरु असते.

५ कोटी ६५ लाख ९० हजार रुपये दान

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली आहे. भाविकांनी गणेशोत्सवातील ११ दिवसात लालबागचा राजाला तब्बल ५ कोटी ६५ लाख ९० हजार रुपये दान केले आहेत. तसेच ४१५१.३६० ग्रॅम सोने आणि ६४३२१ ग्रॅम चांदी दानरूपात जमा झाली आहे. बुधवारी सकाळी विसर्जन करण्याआधी लालबागचा राजा गणपतीचा सोन्याचा मुकूट काढून घेण्यात आला.

अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या या मुकूटाची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे